🧘सकाळ — योग व प्रार्थना
दिवसाची सुरुवात योग, प्रार्थना व स्तोत्रपठणाने. निरोगी शरीर आणि शांत मन.
जीवन अंकुर बाल आश्रमात निराधार मुलांना निवारा, शिक्षण, सकस आहार आणि प्रेम मिळतं.
आमचा प्रभाव
२०१९ पासून मावळ तालुक्यातील निराधार मुलांसाठी अखंड सेवा.

आमच्याबद्दल
शुभ्रा आधार फाउंडेशन संचलित जीवन अंकुर बाल आश्रम, ता. मावळ, जि. पुणे येथे निराधार मुलांना हक्काचं घर मिळतं. निवारा, शिक्षण, पोषण आणि संस्कार — या चार आधारांवर मुलांचं भविष्य उभं राहतं.
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥
अधिक वाचाआमचे कार्य
निवासी सेवा
ज्यांना एकही पालक नाही, किंवा पालक हयात असूनही सांभाळ शक्य नाही, अशा मुलांना कायमस्वरूपी निवारा.
१ ली ते १० वी
जवळच्या शाळेत नियमित प्रवेश, शालेय साहित्य, गणवेश आणि दैनंदिन अभ्यासाची तयारी.
उपचार व तपासणी
नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार व आपत्कालीन रुग्णालय खर्च.
मूल्यशिक्षण
योग, प्रार्थना, वृक्षारोपण व सण-उत्सवांतून मुलांवर संस्कार.
आमचे क्षण
मुलांचं दैनंदिन जीवन, योगवर्ग, सण-उत्सव आणि उपक्रम.

वृक्षारोपण कार्यक्रम

आश्रमातील दैनंदिन योगवर्ग

आश्रमाबाहेर खेळणारी मुले

मुलांसाठी स्नेहभोजन

योग सत्र

आश्रमातील मुले
आश्रमातील दिवस
सकाळच्या प्रार्थनेपासून रात्रीच्या अभ्यासापर्यंत — इथल्या प्रत्येक मुलाला घरासारखी माया मिळते.
🧘दिवसाची सुरुवात योग, प्रार्थना व स्तोत्रपठणाने. निरोगी शरीर आणि शांत मन.
🌱वृक्षारोपण, बागकाम व पर्यावरण उपक्रमांतून मुलांवर संस्कार आणि जबाबदारीची जाणीव.
🍲सर्व मुलं एकत्र बसून सकस, संतुलित आहार घेतात — भाजीपाला, दूध व पौष्टिक जेवण.
📚शाळा, अभ्यास मार्गदर्शन आणि सोबतच मनसोक्त खेळ — बालपण जपणारं वातावरण.
आमचे वेगळेपण
सुरक्षित घर
निराधार मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेमळ निवारा
१ ली ते १० वी
शाळेचा खर्च, गणवेश, वह्या-पुस्तके व अभ्यास मार्गदर्शन
दररोज सकस जेवण
भाजीपाला, दूध व संतुलित आहार — वाढत्या वयासाठी आवश्यक पोषण
शरीर व मन
दैनंदिन योग, प्रार्थना, स्तोत्रपठण व संस्कारवर्ग
आश्रमाची माई आपणास विनंती करते की, यापैकी कोणताही एक खर्च एका महिन्यासाठी आपण उचलू शकता. तीन माह, सहा माह, सालभर किंवा आपल्या इच्छेनुसार सहाय्य करू शकता.

GPay · PhonePe · Paytm · BHIM · Amazon Pay
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥
— संत तुकाराम महाराज
पारदर्शकता
संस्था धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे रीतसर नोंदणीकृत असून आयकर विभागाची ८०जी व १२अ मान्यता प्राप्त आहे. सर्व देणग्यांना करसवलत मिळते.
धर्मादाय आयुक्त, पुणे — नोंदणी क्र. ५५१/२०१९ व एफ-५४७३१
कागदपत्र पहाआयकर विभाग — कलम ३३२(८), URN ABEAS3615DE20261
कागदपत्र पहादेणग्यांना करसवलत — कलम ३५४(४), URN ABEAS3615DF20261
कागदपत्र पहाPDF · नवीन टॅबमध्ये उघडेल
संस्था पूर्णतः विना-अनुदानित आहे — शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत संस्थेच्या कार्याचा ठसा उमटत आहे. सामाजिक कार्यात रस असणाऱ्या दानशूर व्यक्तींना आमची विनंती आहे की, संस्थेला वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी.
80G / 12A कलमांतर्गत आपल्या देणगीस आयकर सवलत मिळते.