🕉सेवा परमो धर्मः🕉
मुखपृष्ठ/आमच्याबद्दल

जीवनअंकुर
बाल आश्रम

शुभ्रा आधार फाउंडेशन संचलित जीवन अंकुर बाल आश्रम — निराधार मुलांना निवारा, शिक्षण, पोषण व संस्कार देणारी सेवाभावी संस्था.

आश्रमातील दैनंदिन योगवर्ग
मावळ, पुणे
आश्रमातील दैनंदिन योगवर्ग
100+
१५ मुले
🪁
प्रास्ताविक

निराधार मुलांसाठी हक्काचं घर

शुभ्रा आधार फाउंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने जीवन अंकुर बाल आश्रमाची स्थापना २९ मार्च २०१९ रोजी मु.पो. साळुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे येथे करण्यात आली.

महाराष्ट्रातील अनाथ, निराधार, ऊसतोड मजुरांची मुले, आदिवासी व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना आश्रमात प्रवेश दिला जातो. येथे राहण्याची व जेवणाची सोय, शालेय शिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत पुरवली जाते.

ग्रामीण भागातील इतर मुलांनाही शालेय साहित्य व शिक्षणासाठी संस्था मदत करते. आतापर्यंत ७०–८० हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेकडून शिक्षणासाठी मदत मिळाली आहे. तसेच प्रत्येक सण, जयंती, उत्सव, योग दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि महिला दिन आश्रमात साजरा केला जातो.

शुभ्रा आधार फाउंडेशन
नोंदणी क्रमांक
रजि. क्र. ५५१/२०१९, पुणे · एफ-५४७३१

आमचे स्तंभ

आम्ही ज्यावर उभे आहोत

🏠
सुरक्षित घर

निवारा

निराधार मुलांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रेमळ निवासाची व्यवस्था.

📚
१ ली ते १० वी

शिक्षण

शाळेचा खर्च, गणवेश, वह्या-पुस्तके आणि दैनंदिन अभ्यासाचे मार्गदर्शन.

🍲
सकस आहार

पोषण

भाजीपाला, दूध व संतुलित आहारातून वाढत्या वयासाठी आवश्यक पोषण.

🧘
मूल्यशिक्षण

संस्कार

योग, प्रार्थना, स्तोत्रपठण व सण-उत्सवांतून मुलांवर सुसंस्कार.

🎯

संस्थेचा उद्देश उद्देश

ज्ञानाचा विस्तार करून ग्रामीण व शहरी भागातील मुला-मुलींना एकत्र आणणे, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे, आणि अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांसोबतच त्यांना आत्मनिर्भर करून समाजात नावलौकिक प्राप्त करून देणे.

👁️

आमची दृष्टी दृष्टी

आश्रमातील प्रत्येक मूल शिक्षण पूर्ण करून आत्मनिर्भर व्हावं, आणि पुढे जाऊन समाजातील इतर निराधारांना आधार देणारं बनावं.

२०१९
स्थापना वर्ष
स्थापना
७०+
विद्यार्थ्यांना मदत
विद्यार्थी
१५
आश्रमातील मुले
मुले
80G
कर सवलत
सवलत
आवाहन

आपली मदत आवश्यक आहे

संस्था पूर्णतः विना-अनुदानित आहे — शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत संस्थेच्या कार्याचा ठसा उमटत आहे. सामाजिक कार्यात रस असणाऱ्या दानशूर व्यक्तींना आमची विनंती आहे की, संस्थेला वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी.

संपर्क

आमची टीम

आश्रमाच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि देणगीसंबंधी माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधा.

👑
मुख्य संपर्क

महादेव मुंडे

📞 9881989569
🤝
संपर्क

महादेव मुंडे

📞 +91 98819 89569
🤝
संपर्क

अनिता मुंडे

📞 +91 95525 97519
पारदर्शकता

नोंदणी व कायदेशीर कागदपत्रे

संस्था धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे रीतसर नोंदणीकृत असून आयकर विभागाची ८०जी व १२अ मान्यता प्राप्त आहे. देणगीदार खालील कागदपत्रे तपासू शकतात.

PANABEAS3615D
80G URNABEAS3615DF20261
12A URNABEAS3615DE20261
वैधताTY 2026-27 → 2028-29

आयकर मान्यता — तपशील

८०जी करसवलत मान्यता

मंजूर
कलम
354(4)
युनिक नोंदणी क्र. (URN)
ABEAS3615DF20261
दस्तऐवज ओळख क्र. (DIN)
ABEAS3615DF2026102
अर्ज क्रमांक
792657760300426
आदेश दिनांक
०७-०५-२०२६
वैधता
TY 2026-27 → 2028-29
जारीकर्ता
Naveen Gupta

१२अ नोंदणी

नोंदणीकृत
कलम
332(8)
युनिक नोंदणी क्र. (URN)
ABEAS3615DE20261
दस्तऐवज ओळख क्र. (DIN)
ABEAS3615DE2026101
अर्ज क्रमांक
792657760300426
आदेश दिनांक
०७-०५-२०२६
वैधता
TY 2026-27 → 2028-29
जारीकर्ता
Naveen Gupta

💛 ८०जी अंतर्गत आपल्या देणगीच्या ५०% रकमेवर आयकर सवलत मिळते.

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात · नवीन टॅबमध्ये उघडतील